जुन्या काळातील एक किस्सा, शेतकरी कथा

🤔🤔
    *जुन्या काळातील एक किस्सा*
     *ज्यावेळी नवीन ट्रॅक्टर फक्त मुंबईतच मिळत असे अन् मुंबईला जाण्यासाठी रेल्वेशिवाय पर्याय नव्हता.अशाकाळात दोन शेतकरी नगदी रक्कम घेऊन ट्रॅक्टर आणण्यासाठी मुंबईला निघाले.*
   *रेल्वेस्टेशनवर जाऊन तिकीट काढून रेल्वेत बसले आणि रात्री आठच्या सुमारास मुंबईत पोहोचले.स्टेशनवर उतरले, काय करावं समजेना,जवळ नगदी पैसे, कावरे बावरे होऊन इकडे तिकडे बघत होते.दुकाने सकाळी दहा वाजता उघडणार,रात्री पैसे घेऊन कोठे झोपायचे? आता काय करावं हा विचार मनात करत होते.असा विचार करता करता ते बाहेर पडण्यासाठी गेटजवळ आल्यावर त्याने जोडीदाराला सांगितले की तू गप्प बस.कांही बोलू नकोस.आणि गेटजवळच्या टी.सी.जवळ जाऊन घाबरून इकडे तिकडे पाहू लागला.*
   *टी.सी.ने त्याला विचारले,"ए तिकीट दिखाव!त्याचा तो करारी आवाज ऐकून दोघेही गर्भगळीत झाले आणि म्हणाले नय साब तिकीट पड्या हाय! झूठ बोलता टिकिट नही निकाला,विदाऊट आया और बोलता पड्या है!चल अंदर चल जेलमे बैठ अभी रात के बारा बजे है,सुबह कल केस दर्ज होगा,जोडीदार घाबरला पहिला त्याला म्हणाला उगं गुमान बस काईच बोलू नगस.टी.सी.ने त्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.*

     *पोलीसांनी त्यांना कोठडीत येऊन बसवलं.खायला नियमाप्रमाणे राईसप्लेट आणून दिले.आणि दोघं तट्टाड झोपले.सकाळी उठून तोंड धुवून चहा पिला दहा वाजता बरोबर टि.सी.आला आणि म्हणाला चलो शेतकरी म्हणाला कुठं नेताव आमाला.चलो विदाऊट तिकीट सफर करना गुनाह है अब तुमारे केस दर्ज होगा.टि.सी.पुढं आणि हे दोघं त्याच्या मागं!गेटजवळ आले टी.सी गुश्श्यात चालत होता.अवो सायब जरा थांबा की तशी हळूच दोन तिकिटं काढून त्याला शेतकऱ्यानं दाखवली.*
. *तिकीटं निरखून टी.सी.पाहू लागला आणि म्हणाला रात को क्यों नही दिखाया? शेतकरी म्हणाला साब हामारे पास इतने सारे रूपय है,हाम यहाँ नये आये हैं|कुछ भी मालूम नही रात को कहां जाएंगे,चोरो का डर| इसीलिए हमने सोचा यही सोएंगे|ऐसे तुम सोने नही देते,ईसलिए हमने दिमाग चलाया l*

      *टि.सी.ने कपाळाला हात मारून घेतला.बाबारे तुम हमारे गुरू बन जाव हम कुछ तुमसे सीखेंगे*
     शेतकरी म्हणाला *"धन्यवाद" साहेब रातभर हमारे लिये खडा पहारा दिया और खाने को भी दिया,सुबह सुबह चा्य पिलायी| इतना सारा तो साले लॉजवाले भी नही करते l टी.सी.म्हणाला जा बाबा जा अब और दिमाग मत खा|*
मोठ्यानं हसत दोघं शेतकरी स्टेशन बाहेर पडले.
    म्हणून म्हणतो 
 *शेतकऱ्यांना अडाणी अन् कमी समजायचं नाही,नाद करायचा नाय!! सगळ्यांचा पोशिंदा आहे, परंतु परिस्थितीने पिचलेला आहे. शेतकऱ्यांचा आदर करा, त्यांना सन्मानाची वागणूक द्या. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.*
......................................🙏🙏....





Comments

Popular posts from this blog

शुभमन गिलला डेंग्यूची लागण, अनेक सामन्यांसाठी बाहेर राहण्याची शक्यता आहे

Amala Paul and Jagat Desai's Christian royal wedding,

हवामान बदल: जागतिक धान्य उत्पादन घटले; 2050 पर्यंत पृथ्वीवरील 90 कोटी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असा संशोधनाचा दावा आहे