लवंग शेती : देशात लवंगांना मोठी मागणी, वाचा लवंग शेतीचे फायदे काय?
लवंगाची शेती: देशातील अनेक शेतकरी लवंगाची शेती करत आहेत. ही लंगग शेती शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर ठरत आहे.
लवंग शेती : देशातील शेतकरी सतत विविध समस्यांना तोंड देत आहेत. कधी अस्मानी तर कधी सुलतानी. या संकटांना तोंड देत काही ठिकाणी शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. शेतकरी आता पारंपरिक पिकांऐवजी विविध पिके घेत आहेत. सध्या देशातील अनेक शेतकरी लवंगाची शेती करत आहेत. ही लंगग शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. लवंगांना सध्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.
लंवग : मागणी वाढल्यामुळं लवंग दरात मोठी वाढ
जेवण तयार करताना लवंगेचा वापर केला जातो. तसेच विविध प्रकराची आयुर्वेदीक औषधं उत्पादन तयार करताना देखील लवंगेचा वापर केला जातो. त्यामुळं देशभरात लवंगेला मोठी मागणी आहे. मागणी वाढल्यामुळं चांगले दरही मिळत आहेत. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. त्यामुळं शेतकरी लंवग पिकाची लागवड करुन चांगले शास्वत उत्पन्न मिळवू शकतात.
Clove farming benefits : लवंग पिकाचे फायदे
हिवाळ्यात लवंग खाल्ल्याने सर्दी, डोकेदुखी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. त्याचबरोबर लवंगीपासून बनवलेली टूथपेस्ट सुद्धा आता बाजारपेठेत आली आहे. लवंगापासून अनेक प्रकारची आयुर्वेदिक प्रसाधने औषधे देखील बनवली जातात. याशिवाय लवंगापासून सौंदर्य उत्पादनेही बनवली जात आहेत. त्यामुळं बाजारपेठेत लवंगेला मोठी मागणी आहे.
उष्ण कटिबंधातील हवामान असलेल्या भागात लंवग पिकाचं उत्पादन घेतलं जात
लवंगेचे पिक हे उष्ण हवामान असलेल्या भागात घेतले जाते. या पिकाची झाडे 30 ते 35 अंश तापमानात वेगाने वाढतात. म्हणूनच महाराष्ट्रातील कोकण भागात ते जास्त घेतले जाते. लवंगाचे रोप लावायचे असेल तर त्याच्या बिया एक दिवस आधी पाण्यात भिजवाव्या. त्यानंतर बियांच्या वरची साल काढून बिया पेरल्या जातात.
50 झाडांपासून दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते
लवंग लागवडीसाठी नेहमी सेंद्रिय खतांचा वापर करावा. लवंग द्राक्षांप्रमाणे गुच्छांमध्ये वाढतात. त्याचा रंग लाल आणि गुलाबी आहे. एका झाडापासून 2 ते 3 किलो लवंग तयार होतात. एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतात सुमारे 50 रोपे लावल्यास त्याला 1.5 ते 2 लाख रुपये नफा मिळू शकतो. लवंगांना सध्या बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.

Comments
Post a Comment