कुसुम सौरपंप योजना;
तर, शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत तुम्ही तीन HP ते साडेसात HP पर्यंतचे सौर कृषी पंप खरेदी करू शकता. त्यात सरकारकडून आम्हाला सर्वाधिक ९५ टक्के अनुदान दिले जात आहे. जर तुम्हाला 7.5 एचपीचा सौर कृषी पंप बसवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त 18 हजार रुपये मोजावे लागतील. उर्वरित सर्व रक्कम प्रशासनामार्फत दिली जाते. म्हणजेच अनुदान भेटते. चला योजनेविषयी पुढे सविस्तर पाहूया.
या सोलर फार्म पंप सेटअपमुळे तुम्ही तुमच्या शेतात तुमची स्वतःची वीज निर्माण करू शकाल आणि ती वीज तुमच्या पंपासाठी वापरता येईल. आता प्रशासनाने सौरपंप खरेदीसाठी अनुदान वाटपाचे काम सुरू केले आहे.
या योजनेद्वारे तुम्ही केवळ 5 ते 10 टक्के भरून सौर कृषी पंप खरेदी करू शकता. या केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम कुसुम सौरपंप योजना राज्यातच नव्हे तर देशभरात राबविण्यात येत आहे.
प्रधानमंत्री कुसुम सौरपंप योजनेतून शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबाराची नोंद आहे आणि त्या सातबारावर बोअर, विहीर किंवा नाल्याची नोंद आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच पाण्याची सोय असलेल्या शेतजमिनीसाठी याचा लाभ घेता येईल
Comments
Post a Comment