कापूस व्हॅन: या सर्वोत्तम दर्जेदार जातींच्या वाणाची लागवड करा, सामान्यत सर्वाधिक: उत्पादन 13 ते 14 क्विंटलपर्यंत मिळवा

 
महाराष्ट्रा मध्ये कापसाचे पीक हे प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, खानदेश, धुळे, नंदुरबार, जळगाव या विभागात पारंपरिक पीक म्हणून घेतले जाते. त्याचप्रमाणे कापसाची लागवड करत असताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारे विचारपूर्वक निर्णय घेऊन वाणाची लागवड करावी लागते. त्याचबरोबर त्या वाणा मधून सर्वात जास्त उत्पादनक्षम उत्पन्न कसे मिळेल याकरिता सुद्धा प्रयत्न करावे लागतील तेव्हाच शेतकऱ्यांना चांगले भरगोस उत्पादन मिळू शकते

तसेच कापसाची लागवड करूनही कापसाचे पीक येईपर्यंत शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. त्यासाठी खूप मेहनतही करावी लागते. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस उत्पादन परवडणारे असावे. त्यासाठी शेतकर्‍यांसाठी पहिला मूलभूत पाया कोणता कापसाचा वाण सर्वोत्तम आहे. आणि त्याचबरोबर शेतकरी कोणती वाण  निवडतो यावर सर्व अवलंबून आहे.

कापूस वाणातील काही अशी वाण आहेत, हे खूप चांगल्या प्रमाणात उत्कृष्ट दर्जेदार उत्पादन देतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशाच प्रतीचे सर्वोत्कृष्ट वाणाची लागवड करावी.

ही वाण निवड सर्वोत्तम असेल

कबड्डी ही तुळशी कंपनीची एक सुधारित जात आहे. या जातीची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आपल्या राज्याव्यतिरिक्त देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यात देखील या वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते. गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगाना आणि आंध्र प्रदेश या प्रमुख कापूस उत्पादक राज्यात कबड्डी वाहनाची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांकडून केली जाते.
महाराष्ट्रातील कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील बहुतांशी भागातील शेतकरी या वाणाला पसंती दाखवतात. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीची मध्यम ते भारी जमिनीत लागवड केली जाऊ शकते. या जातीच्या कपाशीची लागवड 4×1, 3×1, 4×1.5 या अंतरावर लागवड केली पाहिजे.
या जातीपासून 160 ते 165 दिवसात विक्रमी उत्पादन मिळवले जाऊ शकतो. या जातीच्या कापसाचे बोंड आकाराने मोठे असते आणि साधारणतः सहा ते सात ग्रॅम वजन भरते. भारी जमिनीमध्ये लागवड केली तर या जातीपासून साधारणता 15 ते 20 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळू शकत असा दावा केला जातो.
विशेष बाब म्हणजे या जातीचा कापूस वेचणीसाठी अतिशय सोपा असतो. या जातीचा कापूस वेचण्यासाठी सोपा असल्याने शेतकऱ्यांमध्ये या जातीपासून चांगल्या प्रतीचे उत्पादन अलीकडे विशेष लोकप्रिय बनले आहे. यामुळे राज्यातील बहुतांशी कापूस उत्पादक शेतकरी या जातीच्या लागवडीस पसंती दाखवतात. या जातीपासून चांगले उत्पादन मिळत असल्याने याचा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.


Comments

Popular posts from this blog

शुभमन गिलला डेंग्यूची लागण, अनेक सामन्यांसाठी बाहेर राहण्याची शक्यता आहे

Amala Paul and Jagat Desai's Christian royal wedding,

हवामान बदल: जागतिक धान्य उत्पादन घटले; 2050 पर्यंत पृथ्वीवरील 90 कोटी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असा संशोधनाचा दावा आहे