Rain alert. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊसचा तडाखा.

 


गेल्या काही वर्षांपासून राज्यभरातील वातावरणात अनपेक्षित बदल दिसून येत आहेत. ज्यामध्ये कोणत्याही ऋतूमध्ये इतर कोणताही रुतू बदलाची जाणीव होते. उन्हाळ्यात पावसाळी वातावरण, पावसाळ्यात हिवाळा आणि हिवाळ्यात उन्हाळा असे वातावरण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देश अनुभवत आहे.

मागील महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला, शेतकऱ्यांच जनजीवन विस्कळीत झाले होते. गेले काही दिवस मोकळी राहिलेल्या वातावरणाने उन्हाळ्यामध्ये उन्हाचा चटका तर वाढलाच होता. परंतु नव्याने आलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.


गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानी मधून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा एकदा अवकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.

हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.


पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागे झालेल्या पावसामध्ये मका, तुर, केळी, हरभरा यासारख्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात 
केल्यानंतर; पाऊस आणखी उरलेल्या पिकांचे नुकसान करतो की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागलेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून घेतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

शुभमन गिलला डेंग्यूची लागण, अनेक सामन्यांसाठी बाहेर राहण्याची शक्यता आहे

Amala Paul and Jagat Desai's Christian royal wedding,

हवामान बदल: जागतिक धान्य उत्पादन घटले; 2050 पर्यंत पृथ्वीवरील 90 कोटी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असा संशोधनाचा दावा आहे