आपण घरी किती रोख पैसे ठेवू शकता? आयकराचे नवीन नियम लागू
सध्याच्या या धावपळीच्या जगात आपण आपल्या नौकरी व्यावसायिक विविध क्षेत्रात व्यस्त असतो, पण आपल्याकडे अर्थिक विश्लेषण मॅनेजमेंट करण्यासाठी वेळ हा अत्यल्प प्रमाणाच्या उपलब्धतेवर ते आपण करतो.
इन्कम टॅक्सचे नवीन नियम :
बरेच लोक गरजेपेक्षा जास्तीची रोकड घरी ठेवतात कारण तत्कालीन वेळ आल्यावर काही तांत्रिक अडचणींमुळे बँक किंवा एटीएममधून त्वरित पैसे काढणे अशक्य असते. तुम्ही तुमच्या घरात थोडीफार रोकड ठेवत असाल, पण घरात रोकड ठेवण्याची मर्यादा तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त रक्कम घरात ठेवत असाल तर आयकर विभाग तुमच्यावर कारवाई देखील करू शकतो. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. (आयकर नियमानुसार तुम्हाला घरी रोख मर्यादा ठेवावी लागेल)
मुळात घरात किती पैसे ठेवावेत याची कोणतीही मर्यादा दिल्याली नाही. पण आयकर नियमांनुसार तुम्ही कितीही पैसे घरात ठेवू शकता. मात्र हे पैसे किंवा रोख चेकिंग एजन्सीच्या हातात आल्यास त्यांना या पैशाचा स्रोत सांगावा लागेल. इन्कम टॅक्सचे नवीन नियम जर तुम्ही कायदेशीररित्या पैसे कमवले असतील, तुम्ही सर्व कागदपत्रे किंवा आयकर रिटर्न भरले असतील, तर घाबरण्याचे कारण नाही, पण जर तुम्ही स्त्रोत उघड केला नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

Comments
Post a Comment