यंदा महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? जूनमध्ये पडेल की नाही? सरासरी गाठेल का?
यंदाचा मान्सूनचा आढावा आणि महाराष्ट्र
देशाचा अर्थशास्त्र अशी ओळख असलेला मान्सून म्हणजे वरूनराजा पुढील महिन्यात भारतात दाखल होईल. त्याच्या येण्यावर आणि तो वीजेच्या⚡ कडकडाटसह बरसण्यावरच सारे काही अवलंबून आहे. खासकरुन शेतकऱ्यांची त्याच्याकडे सर्वाधिक ओढ लागून असते. यंदाचा मान्सून कसा असेल याबाबत भारतीय हवामान विभागाने दुसरा अंदाज जाहीर केला आहे. आता आपण या मान्सूनबाबत आणि खासकरुन त्याच्या महाराष्ट्रातील बरसण्याबाबत अधिक जाणून घेऊ….
वायव्य भारत वगळता देशभरात पाऊस सरासरी इतकाच राहील. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यात तापमान वाढीसोबतच महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पावसाळ्यात 'अल निनो'च्या प्रभावामुळे आयओडीला दिलासा मिळेल. त्यामुळे अंदमानच्या दक्षिणेकडे मान्सून अजूनही कायम आहे. थोडक्यात या वर्षीच्या मान्सूनची ही वैशिष्ट्ये आहेत.
हवामान खात्याने दुस-या टप्प्यात सुधारित अंदाज देताना, वायव्य भारत वगळता देशभरात सरासरी 96 ते 104% ± 4 पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Comments
Post a Comment