वन विभाग : वन विभागात ९६४० पदांसाठी ऑनलाइन भरती, ही असेल पात्रता
Forest Department : यंदाच्या वर्षांत राज्य सरकारच्यावतीने सर्वच विभागातील रिक्त पदाची भरती करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे वनविभागातील वनरक्षकाच्या राज्यभरात एकूण 9640 पद मंजूर झालेले, त्यापैकी 2071 हे रिक्त आहेत.
शिवाय यंत्रणेवर वाढत्या कामाच्या ताणामुळे वाढीव पदांची संख्या यात समाविष्ट होईल त्यामुळे वनविभागात आता मेगा भरती होईल,MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी असून नेमकी किती पदाची भरती होईल याची स्पष्टता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर होईल, शासनाने घटकांमधील लिपिक आणि टंकलेखक संवर्गाची भरती एमपीएससी मार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
त्याअंतर्गतच आता राज्य शासनाच्या सर्व विभागातील या संवर्गातील पदे एमपीएससी मार्फत भरले जाणार आहेत, त्यामुळे पुढील वर्षी जानेवारीपासून ते जून महिन्यापर्यंत सर्वच विभागातील रिक्त पदांचा शिल्लक असलेला बॅकलॉग भरून निघणार आहे, त्यासाठी रोस्टर प्रक्रिया पूर्ण करून त्याची सर्व माहिती आपापल्या विभागाचे सचिवाककडून सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करायचे आहे.
संबंधित विभागाने ती त्वरित पूर्ण करून पाठवल्यास लगेच भरती केली जाणार आहे, गेल्या दोन वर्षापासून वन विभागात वनरक्षकाच्या रिक्त पदाच्या भरतीची प्रतीक्षा होती, राज्य शासनाने तलाठी लिपिक आणि आता वनविभागात भरतीच्या प्रक्रिया सुरू केल्याने राज्यात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. (Forest Department Bharti)
पूर्वी पेसा क्षेत्रातील वनरक्षकाची 100% पदेही स्थानिक अनुसूचित जमाती करिता राखीव होती, त्यानंतर 29 ऑगस्ट 2019 रोजी राज्यपालांच्या आदेशाने पेसा क्षेत्रातील पदे अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येनुसार 100% 50% आणि 25% याप्रमाणे राखीव करण्यात आले आहेत त्यामुळे नेमकी कुठल्या आदेशान्वये भरती करायची याबाबत अप्पर प्रधान मुख्यमंत्री मुख्य वनसंवरक्षकांनी शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहेत.
ते प्राप्त होतात पैसे क्षेत्रातील पदभरतीसाठी सूचना नव्याने स्वातंत्र्यरित्या निर्गमित केल्या जाणार आहेत, बिगर पेसा क्षेत्रातील वनरक्षक भरतीसाठी नियोजित कालबद्ध कार्यक्रम जाहीर असून त्यानुसार ती पदे भरली जातील विभागात एकूण 9640 पदे मंजूर झाले असून 2071 पदे ही रिक्त आहेत.
परीक्षा कशी असेल (Forest Department)
पात्र उमेदवारांची 120 गुणांची लेखी परीक्षा होईल 90 मिनिटाचा कालावधी राहील चार विषयांचा समावेश असेल माध्यमिक अर्थात दहावीच्या पातळीची ही परीक्षा राहणार आहे.उमेदवार मात्र बारावी उत्तीर्ण हवा त्यामध्ये सामान्य ज्ञान-30 गुण (सामान्य ज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास,वन, पर्यावरण, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण, संतुलन)
बौद्धिक चाचणी – 30 गुणाची तर मराठी-30 तर इंग्रजी-30 ची होईल.

Comments
Post a Comment