डीके शिवकुमार आणि सिध्दरामय्या यांनी मंगळवारी नवी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.

नुकतेच काही दिवस झाले कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. काँग्रेसच्या या विजयानंतर कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे दोन नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसच्या गोटातून हालचालींना वेग आला आहे.
Comments
Post a Comment