आनंदाची बातमी मित्रांनो! आता शेतकऱ्यांना मिळणार बियाणे खरेदीसाठी ‘इतके’ अनुदान; येथे करा अर्ज! बियाणे आनुदान या योजनेंतर्गत 2023 मिळेल.


 राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर बियाणे अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना आता २० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. विशेष म्हणजे सोयाबीनसाठी प्रतिकिलो १२ रुपये अनुदान मिळणार आहे.  बियाणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील लिंक वरून mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. 


मका, बाजरीला १०० रुपये अनुदान  पिकानुसार निवडलेल्या संबंधित जिल्ह्यांमध्ये भात बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास प्रतिकिलो २० रुपये प्रति किलो, १० वर्षांवरील वाणास दहा रुपये अनुदान मिळेल. कडधान्य बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास ५० रुपये, १० वर्षांवरील वाणास २५ रुपये मिळतील. मात्र संकरित मका व बाजरी बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास १०० रुपये मिळणार आहेत. 

  या संकेतस्थळावर क्लिक करा👇

 mahadbtmahait.gov.in

पीक प्रात्यक्षिकांसाठीही अनुदान  पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान मिळेल. बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, भू-सुधारके व पीक संरक्षण रसायनांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार दोन ते चार हजार रुपयांपर्यंतचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. यात कृषी विद्यापीठांच्या सल्ल्याने तयार होणारे जिल्हानिहाय पूर्ण पॅकेज शेतकऱ्याला वापरणे अनिवार्य असेल. 

ऑनलाइन लॉटरीत निवडलेल्या शेतकऱ्याला तूर, मूग, उडदापैकी एका पिकाचे चार किलोचे एक बियाणे मिनी किट मिळणार आहे. यात प्रति चार किलोच्या तुरीच्या कीटसाठी ४१२ रुपये, मुगासाठी ४०७ रुपये, उडदासाठी ३४९ अनुदान असेल. बियाणे मिनी किटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम मात्र शेतकऱ्यांनी द्यावी लागणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

शुभमन गिलला डेंग्यूची लागण, अनेक सामन्यांसाठी बाहेर राहण्याची शक्यता आहे

Amala Paul and Jagat Desai's Christian royal wedding,

हवामान बदल: जागतिक धान्य उत्पादन घटले; 2050 पर्यंत पृथ्वीवरील 90 कोटी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असा संशोधनाचा दावा आहे